चंद्रपूर ,वरोरा २१एप्रिल :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वरोरा येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकी बाबात आढावा घेण्यात आला.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत वरोरा – भद्रावती विधानसभेत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी जनसामान्यांपर्यंत पोहचून पक्षाची भूमिका मांडावी व पक्ष संघटनावाढीसाठी व जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने आपला प्रतिनिधी पाठविण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी बैठकीदरम्यान केले. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी,शाखा प्रमुख,विभाग प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.