श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेनिमित्त कमल स्पोर्टीग क्लब चंद्रपूरच्या वतीने भाविकांना बुंदी वितरण

0
17

 

चंद्रपूर: प्रभु श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दि. १७ एप्रिल २०२४ रोजी समाधीवार्डातील श्री काळाराम मंदीर येथून श्रीराम मुर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा मंदीर परिसरापासून ते गांधी चौक जटपुरा गेट-कस्तुरबा रोड मार्गे-गिरनार चौक ते काळाराम मंदीर येथे विसर्जित करण्यात आली.

 

या शोभायात्रेत रथावर विराजमान प्रभु श्रीरामजींच्या मुर्तीचे पुजन, माल्यार्पण व शोभायात्रेचे भव्य स्वागत कमल स्पोर्टीग क्लबचे जिल्हाध्यक्ष युवा नेते रघुवीर अहीर यांनी व उपस्थितांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पोर्टीग क्लबच्या वतीने रामभक्त व भाविकांसाठी बुंदा वाटप कार्यक्रम रघुवीर अहीर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडले. या कार्यक्रमाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.

या कार्यक्रमास महानगराचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश सदस्य विनोद शेरकी, राहुल गायकवाड, राजेश वाकोडे, विशाल गिरी, मयुर बोकडे, चेतन शर्मा, अक्षय ठक्कर, सुदामा यादव, प्रविण चुनारकर, अक्षय सोनी, कमल कजलीवाले, राजवीर चौधरी, विपीन मेंढे, कृपेश बडकेलवार, अक्षय चंदनखेडे, प्रज्वल गिलबिले यांचेसह कमल स्पोर्टीग क्लबचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here