बल्लारपूर- बल्लारपूर शहरातील सर्वात मोठे वार्ड म्हणून ओळखले जात असणाऱ्या विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे मार्बल प्लट ने झाशी राणी चौक चे नामांतर करण्या करण्या करिता झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी गेल्या दिड वर्षा पासून बल्लारपूर नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या कडे वारंवार निवेदन द्वारे, कॉल द्वारे व प्रत्यक्ष भेटून सुध्दा मागणी केली असून सुद्धा बल्लारपूर नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आतापर्यंत ही मागणी पूर्ण करून दिली नाही तसेच झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे रोहन कळसकर हे जेव्हा जेव्हा नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्याधिकारी विशाल वाघ यांना या मागणी च्या संदर्भात विचारपूस करण्या करिता कॉल किंवा प्रत्यक्ष ऑफिस ला जावून भेट देतात तेव्हा तेव्हा नगर परिषद बल्लारपूर चे मुख्याधिकारी विशाल वाघ हे बांधकाम विभाग असलेले कर्मचारी प्रणय वाटेकर यांना भेटण्यासाठी सांगतात . यावर नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्याधिकारी यांना झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांच्या सवाल आहे की नगर परिषद बल्लारपूर येथील मुख्याधिकारी या पदावरून काम करणाऱ्या अधिकारी पेक्षा बांधकाम विभागात काम करणाऱे कर्मचारी प्रणय वाटेकर हे खुप मोठ्या पदावर आहे काय❓
नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्याधिकारी साहेब मला या प्रश्नाचे उत्तर मला लेखी स्वरूपात देण्यात यावे. व झाशी राणी चौक येथील मागणी पूर्ण करण्यात यावे. जर नगर परिषद बल्लारपूर हे विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील मागणी पूर्ण करून देण्यात टाळाटाळ करत असणार तर नगर परिषद बल्लारपूर ने यांचे स्पष्ट कारण काय आहे❓
हे आम्हांला लेखी स्वरूपात देण्यात यावे. या नंतर आम्ही नगर परिषद बल्लारपूर यांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता आम्ही स्व:ता आमच्या स्व:ताच्या खर्चाने आम्हची मागणी पूर्ण करून दाखवणार हा अशा इशारा झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांना दिला आहे.