वारंवार जिव घेणा-या पुलाचे काम तात्काळ सुरू न केल्यामुळे टोल कंपनी आणि बांधकाम* *विभागा विरोधात आम आदमी पार्टीचे 20 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन.

0
41

 

चंद्रपूर:- शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर बल्लारशाह राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण सतत वाढल्याने त्याठिकाणी अपघातांची मालिका थांबन्याचे नाव घेत नाही आहे. याच महामार्गांवर अष्टभुजा बाबूपेठचा मध्यभागी रेल्वे ओवर ब्रिजचे काम टोल कंपनीने रेल्वे ची परवानगी भेटून सुद्दा ब्रिज चे काम पूर्ण न केल्याने अनेक प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तसेच या महामार्गावर सर्विस रोड नसल्याने स्मशान भूमिकडे प्रेत यात्रा नेणाऱ्या लोकांच्या गर्दीला याचा धोका असून केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच सर्व्हिस रोड नसल्याने रोड वरती उभ्या असलेल्या ट्रक मुळे सुद्दा अपघात घडत आहे. आपली नैतिक जिम्मेदारी सोडून जनतेकडून सर्रास टॅक्स वसुली करणाऱ्या विसापूर येथील WCBTRL कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून भविष्यात होणाऱ्या अपघाताची जिम्मेदारी टोल कंपनीने स्वीकारावी व तात्काळ पुलाचे काम सुरू करावे या करिता दिनांक 20/02/2024 ला ठीक 11 वाजता अष्टभूजा जवळील रेल्वे ओवर ब्रिज वरती रास्ता रोको आंदोलन आम आदमी पक्षांच्या वतीने केले जाणार असून बहुसंख्य जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाद्यक्ष राजू कुडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here