युवासेना, युवतीसेना मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम समारंभ चंद्रपूर जिल्हा युवतीसेना चे युवती जिल्हाध्यक्षा म.सौ.रोहिणी पाटील यांचा कर्तुत्वाला सल्यूट….!
चंद्रपूर:-युवासेना प्रमुख आमदार मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सहसचिव व युवती जिल्हा अध्यक्षा सौ.रोहिणी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा येथे युवतीसेने अंतर्गत सौभाग्याचं एक मानसन्मान चिन्ह म्हणून समाजात स्वतःचा एक परिचय करुन स्वयं रोजगार करणारे महीलान सोबत “हळदीकुंकू” हा कार्यक्रम घेण्यात आला..!
गेल्या ३ वर्षा पासुन हा उपक्रम भाजीपाला करणाऱ्या स्त्रियांसोबत करण्यात येतो. या वर्षीही शहरातील गंजवार्ड,एसटी वर्कशॉप चौक,बाजार समिती, गोल बाजार अश्या अनेक लोकांना सोबत घेऊन एका सौभाग्याचं निशानीच हळदी कुंकवाच्या कार्यक्राअंतर्गत भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांसोबत हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला… त्या सोबतच लोकांचं जीवन जगणे कळे लक्ष वेधून स्वतः काळजी घ्या आणि लोकांना सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे म्हणून एका संदेशा स्वरूपात “SAY NO TO PLASTIC” प्लास्टिक चा वापर भाजीपाला विक्रेत्यांनी बंद करा. हे पण सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमास युवती उपजिल्हा अध्यक्षा धनश्री हेडाऊ उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले, शहर युवती अध्यक्षा हिमानी मेश्राम, उपविभाग युवती अधिकारी रोशनी गोलदार आरती नवघरे ,राखी हणवते आदि युवती उपस्थित होत्या.