चंद्रपूर:-चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रिडा महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भिवापूर प्रभाग जूनी वस्ती येथे उद्या पासून कबड्डी स्पर्धेला सुरवात होणार आहे.
मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध क्रिडा स्पर्धा घेतल्या जाणार आहे. तर उद्या 2 फेब्रुवारी पासून भिवापूर येथे जय श्रीराम क्रिडा मंडळ च्या सहकार्याने पूरुष व महिलांचे कबड्डी सामने खेळल्या जाणार आहे. 4 फेब्रुवारी पर्यंत सदर कार्यक्रम चालणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहण आयोजनकांच्या वतीने करण्यात आले आहे.