आजचा अर्थसंकल्प विकसित राष्ट्राचा पाया, राज्याच्या विकासाला मिळणार गती – आ. किशोर जोरगेवार

0
14

 

चंद्रपूर:-आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, युवक, महिला, गरिब आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला असून यात जिडीपी वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचा नक्कीच महाराष्टाला फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा एकंदरीत विचार केला असता आजचा अर्थसंकल्प हा विकसित राष्ट्राचा पाया असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. यात आज सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. या सरकाच्या कार्यकाळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्र सरकारचा भर राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी लोकांच्या घरात सौर रूफटॉप यंत्रणा बसवली जाणार आहे.त्यामुळे ३०० युनिट पर्यंतची वीज सदर कुटुंबियांना मोफत मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आणखी 2 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले जाईल त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 10 वर्षात महिलांना 30 कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. विविध क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. आज सादर केलेल्या अर्थसकंल्पात आर्थिक क्षेत्र मजबूत होणार असून लोकांसाठी नवीन संधी वाढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here