बल्लारपूर:- भरधाव वेगाने मोपेड ची धडक बसून एक गंभीर जखमी झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार रमाबाई चौक, विद्या नगर येथील युवक संकेत धीरज चांदेकर हा पायदळ रस्त्याने जात असता समोरून मुदस्सिर शेख रा. महाराणा प्रताप वार्ड हा मोपेड क्र. एमएच ३४ टी २३८९ ने भरधाव वेगाने येत संकेत यास धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागले असून त्याला चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथे अतीदक्षता विभागात भरती केले आहे.
तसेच मोपेड चालक मुदस्सिर शेख याचा पायाला व डोक्याला मार लागले आहे. पोलिसांनी मोपेड चालक मुदस्सिर अब्दुल वहाब शेख याचा वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.