रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

0
16

 

बल्लारपूर:- शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरातील विवेकानंद वार्ड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात त्याच प्रमाणे या वर्षी सुद्धा विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथे सकाळी 9.00.वाजता बल्लारपूर नगर परिषद चे माजी नगरसेवक अरुण वाघमारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व राष्ट्राध्वजाला सलामी देण्या आली. त्या नंतर सायंकाळी 6.00 वाजता बल्लारपूर शहरातील अतिशय उत्कृष्ट पणाने सामाजात कामगिरी करणाऱ्या विविध सामाजिक संघटनेच्या व विविध संस्थेच्या सत्कार करण्यात आला तसेच सायंकाळी 7.00 वाजता देशभक्ती व महापुरुषांच्या जीवनावरील आवाज निळ्या वादळाच्या बहादार सुंगम संगीत च्या कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष सुमनताई कळसकर, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळसकर, भाजपा युवा मोर्चा चे महाराष्ट्र सचिव आशिष दादा देवतळे, भाजपा युवा मोर्चा चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सौरभ दादा मेनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे, विश्वशांती युवा मंच बल्लारपूर चे अध्यक्ष सुमित ( गोलु) डोहणे , सामाजिक देविदास करमरकर व राजेश ब्राह्मणे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्थे अध्यक्ष सुमनताई कळसकर , सचिव प्राचीताई झामरे, लिला कळसकर , डेशी थाॅमस, रतन बांबोळे, प्रदीप झामरे , पुरूषोत्तम कळसकर, अशोक मेश्राम, ॲड. सुमित आमटे, नागेश रत्नपारखी , झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन कळसकर व मुख्य संयोजक आतिक भैय्या शेख यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुर्ण ताकदीने सहकार्य करण्या साठी सुजित पाझारे, शरद पिंदूरकर, सुनील मेश्राम, ज्ञानेश्वर कोत्तपलीवार, अमोल अलोने कपिल कळसकर, किरण ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर चे अध्यक्ष गोविंदराव वनकर , बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील सर, महिला मंडळ चे शिखा मुळे, लता वनकर, दिपमाला अलोने, वनश्री अलोने, करूणा अलोने, रजनी पाझारे, आशा मेश्राम, यांनी अतिशय मोलाचे सहकार्य व योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here