चंद्रपुर:-उर्जानगर ( कोंडी ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज दि.26 जानेवारी 2023 रोज शुक्रवारला सकाळी ठीक 7.30 वाजता 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे चंद्रपुर तालुका प्रमुख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, संतोषभाऊ पारखी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत, उर्जानगरचे माजी सरपंच सुधाकर उर्फ तुराज रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राम पंचायत, उर्जानगरचे माजी सदस्य संजय गिलबिले, सामाजिक कार्यकर्त्या शैलिका सागवरे, मुख्याध्यापक सुधाकर धानोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नामन पवार, शांताराम रामटेके व गावकरी नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी वर्ग 2 रा कु. प्राजक्ता विनोद ठमके व वर्ग 1 ला अनुष्का ह्यांचा वाढदिवस असल्यामुळे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मुले व मुलींनी तसेच मुख्याधापक सुधाकर धानोरकर सर, शिक्षक राजू दर्वे सर, सुरेखा वांढरे मॅडम, स्मिता कातकर मॅडम आदिनी प्रयत्न केले.💐🌹🎍🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏🙏