चंद्रपुर :- येथील बल्लारपूर PWD गेस्ट हॉउस येथे दि. 24 जानेवारी 2024 रोज बुधवारला दु. 2:00 वा. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्नेह मिलन व पक्ष प्रवेश कार्यक्रम सोहळा शिवसेना उप जिल्हाप्रमुख कमलेशभाई शुक्ला यांनी पुढाकार घेवून शिवसेना महिला आघाडीच्या (बल्लारपुर, वरोरा, चिमूर विधानसभा क्षेत्र) चंद्रपूर जिल्हाप्रमुख मा,सौ, मिनलताई आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेह मिलन व शेकडो महिलांचा भव्य पक्ष प्रवेश करुन नियुक्त्या करण्यात आल्या.
यामध्ये शिवसेना महिला आघाडी बल्लारपुर विधानसभा उपजिल्हा प्रमुखपदी सुलोचना कोकोड़े, बल्लारपुर तालुका प्रमुखपदी शालू कन्नाके, बल्लारपुर उपतालुका प्रमुखपदी संगीता सिडाम, बल्लारपुर शहर प्रमुखपदी विभा चौबे व बल्लारपुर उपशहर प्रमुखपदी किरण हिरवानी यांच्या नियुक्त्या करण्यात आली.
सदर स्नेह मिलन व पक्ष प्रवेशाचा सोहळा निमित्त शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी, वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धिमान, तालुका संघटक संजयकुमार शिंदे, बल्लारपुर उपतालुका बालाजी सातपुते, चंद्रपुर उपतालुका प्रमुख गुरुदास मेश्राम, भद्रावती माजी तालुका प्रमुख नरेश काळे, माजी नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, योगेश म्यानेवार, राजू रायपुरे यांची उपस्थिती होती.