सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक- २३/जानेवारी/२०२४ ला राजुरा येथील सम्राट सेलिब्रेशन हॉलमध्ये आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमांमध्ये विशेषतः राजुरा मधील प्रचंड महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन काही महिलांनी गाणे म्हणून तर काही महिलांनी उखाणे म्हणत विविध प्रकारच्या कलाकृती करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. व या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या संपूर्ण महिलांना साडी चे वाटप करण्यात आले व भांडे देखील वाटप करण्यात आले. यासह आम आदमी पक्षाचे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामधील जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने सक्रियपणे मार्गी लावण्याच्या कामाला प्रेरित होऊन व आम आदमी पक्षाने दिल्ली पंजाब या राज्यांमध्ये ज्या प्रकारे शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था यासह रोजगार निर्मिती सारखे विविध विकास कामे केलेल्या कामांचे कौतुक करत आम्हाला देखील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये अशाच प्रकारे बदल हवा अशी भावना व्यक्त करत महिलांनी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या हस्ते आम आदमी पक्षामध्ये भव्य दिव्य असा पक्षप्रवेश केला. व आपापल्या भागातील समस्या देखील यावेळेस महिलांनी सुरज भाऊ ठाकरे यांना परस्पर भेटून सांगितल्यानंतर या सर्व समस्यांची दखल घेत तात्काळ सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळेस श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी महिलांना दिले. अशाप्रकारे आज पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या पत्नी सौ. सोनाली ठाकरे, ममता बैस्वारे, आम आदमी पक्षाच्या राजुरा येथील महिला पदाधिकारी सौ. प्रतीक्षाताई पिपरे, सौ. सरिताताई कोंडावार, व सहकारी सौ. सविताताई रागीट, सौ. ज्योतीताई कुरील, सौ. हर्षाताई साटोणे, सौ. रश्मीताई साटोणे, सौ. सुमित्राताई कुचणकर, यासह आम आदमी पक्षाचे पदाधिकारी श्री. राज चौधरी, श्री. मिलिंद सोनटक्के, श्री. रोशन बंडेवार, श्री. महेश ठाकरे, सिद्धेश्वर कोल्हाटवार,समाजसेवक श्री. बिरबल महाराज जी, निखिल बाजाईत, राहुल चव्हान, स्वप्नील दाते आधी सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी होऊ नये पार पाडले.