रेखा कैथल
जिला ब्यूरो चीफ
घुग्घुस:- शहरातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करा अशी मागणी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी निवेदनातून केली आहे.
सध्या घुग्घुस शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून मोकाट कुत्रे अधिक हिंसक झाले आहे. वेकोलिच्या रामनगर वसाहती राहणाऱ्या कौशिका सुंदरगिरी या पाच वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला करून चावा घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
शहरातील अनेक वार्डात मोकाट कुत्रे फिरत असून अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळे दुचाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवघेणी घटना घडू शकते मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा नाहक त्रास शहर वासियांना करावा लागत आहे.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांची महिलांनी भेट घेतली व हि समस्या सांगितली समस्येची तत्काळ दखल घेत प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी महिलांसह नगर परिषदेत धडक देत न.प. च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन दिले याप्रसंगी न. प. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, निशा उरकुडे, वैशाली देवतळे, संगीता गोड्डावार, निर्मला पोन्नाला, सुनंदा लिहीतकर, सुंदरीचा केवट, नीता मालेकर, पद्मा चिट्टाला, प्रणिता राठोड, पूजा आवळे, सुमन बेलोरकर, मंदा थेरे व महिला उपस्थित होत्या.