चंद्रपूर:- ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या आदेशानुसार दि. 24 दिसेंबर 2023 ला शासकिय विश्रामगृह VIP गेस्ट हाउस, चांदा क्लब जवळ चंद्रपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य ग्राहक मेळावा आयोजित करुन मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रमुख मार्गदर्शन तथा मुख्य अतिथी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार मा. श्री. वामनराव चटप यांच्या उपस्थितीत व चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पारखी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्राहक दिन म्हटले कि ग्राहकांचे हक्क, अधिकार व सुविधा यांचा समावेश असून ग्राहकांची होत असलेली फसवणूक, लूट होत असतांना आज प्रत्येक पाऊलां-पाउलांवर पाहायला मिळते. याचेच परिणाम आज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात असल्यामुळे ग्राहकांच्या समस्या निदर्शनात घेत शासनाने इ.स.१९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
माजी आमदार मा. श्री. वामनराव चटप राजुरा विधानसभा क्षेत्र व विदर्भ राज्य आंदोलन नेते यांनी मार्गदर्शन करीत वेगळा विदर्भ राज्याविना आज विदर्भ वासियांना पर्याय नाही, या संदर्भात माहिती दिली व ग्राहक हिता करीत सदैव कटीबद्द असण्याचे सांगितले. आपल्या समिती मार्फत होत असलेले कार्य हे ग्राहक हितार्थ कार्य असून असेच कार्य सेवा अविरत असू द्या, ग्राहकांच्या हक्कासाठी लढताना अनेक वेळा अडचणी समोर येतील.
परंतु अडचणी समोर जाऊन कार्य करणे म्हणजे समाज सेवा, ग्राहक सेवा असे सांगितले. ग्राहक दीनानिमित्य चंद्रपूर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ पारखी, जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार मा.श्री. विरेंद्र पुणेकर ( Veerendra Punekar ), जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. संजयकुमार शिंदे, जिल्हा संघटक मा. श्री. दीपक नन्हेट – जिल्हा सचिव मा. श्री. मुन्ना ईलटम, जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. कमलेश शुक्ला, जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. अरविंद धिमान, मीडिया ( प्रसिद्धी ) प्रमुख मा. श्री. धम्मशिल शेंडे, कायदेशीर सल्लागार मा. श्री. ऍड. रवी धवन, जिल्हा सदस्य मा. श्री.अविनाश ऊके, जिल्हा सदस्य मा. राजू रायपुरे, गुरुदास मेश्राम, मंगेश वांढरे, मुक्कदरसिंग बावरे, तरुण येंगनटीवार, मयूर अंबादे, सर्व सदस्य व ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.