श्री लखमापूर हनुमान मंदिर सेवा समिती तथा श्री जलाराम सेवा मंडळाच्या वतीने श्री रामकथेचे आयोजन
चंद्रपूर:- रामायण हे वाल्मिकीच्या कलमेनी रचलेले प्रेरणादायी काव्य आहे. संस्कृती, नैतिकता, आणि मानवीय मूल्यांचे प्रत्यक्ष वर्णन यात करण्यात आले आहे. त्यामुळे सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी रामकथेचे आयोजन गरजेचे आहे. एकंदरीत विचार केला असता रामायण हे कल्याणकारी युध्दाच, प्रेमाच आणि धर्माचा वर्णन करणारे काव्य आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
श्री लखमापूर हनुमान मंदिर सेवा समिती तथा श्री जलाराम सेवा मंडळच्या वतीने लखमापूर मंदिर येथे मुंबई येथील कथा वाचक परमपूज्य श्री नरेशभाई राज्यगुरु यांच्या श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महानगरपालिका मनपा आयुक्त विपिन पालीवाल मनिष सुचक, मुन्ना व्यास, राजु सादरानी रमेश शर्मा, कमलेश विजयवर्गीय विरेंदसिंग राजपूत चिराग नथवानी, हर्षद रुखीयाना, मुकेश सुचक, विरेश राजा, नितिन माहेश्वरी, उमाशंकर सिंग, मेहूल सचदे, रितेश सागलाणी, राजू पनपालिया, रुपीन सादरानी, पूनम तिवारी गोपाल मुंधडा आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, टेलीविजन, मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात आजची युवा पिढी धार्मिकतेकडून दुरावली जात असेल तर हे भविष्यासाठी योग्य नाही. त्यामुळे युवकांनीही धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहीजे. अनेक सामाजिक संस्था आणि देवस्थान कमिटीच्या वतीने असे धार्मिक कार्यक्रम आपण नियमित करत आहात. आपणही चंद्रपूरात भजन महोत्सव आणि महाकाली महोत्सवाची सुरवात केली आहे. महाशिवरात्री निमित्त आपण दरवर्षी भजन महोत्सव घेतो यात विविध भाषीय शेकडो भजन मंडळ सहभागी होत असतात. तर आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सवाला ही सुरवात केली आहे.
आपण श्री रामकथेचे आयोजन केले आहे. या आयोजनाची भव्यता प्रभु श्री रामा बदल आपले स्नेह दर्शविणारी आहे. प्रभु राम आपले श्रध्दास्थान आहे. आजही आपण एकमेकांच्या भेटी गाठी घेत असतांना राम नामाचा उल्लेख करतो प्रभु श्री राम हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहे. आज या रामकथेतून मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम यांच्या त्यागावर प्रकाश आपण टाकला आहे. आपल्यावर आलेल्या छोट्या संकटात आपण खचतो मात्र प्रभु श्री रामाने राजवैभव सोडून हसणाऱ्या मुखाने वनवास भोगला हा त्यांचा त्याग संकटाशी हसत लढ्याची प्रेरणा देतो असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला प्रभु रामभक्त आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.