चंद्रपूर:- महाकाली नारीशक्ती संमेलनात “वेगळ्या वाटा” या विषयास अनुसरून सामाजिक कार्य करणाऱ्या व समाजात ज्यांचे अतुलनीय योगदान आहे व समाजासाठी आदर्श असणाऱ्या भावसार भगिनींचा साडेसोळी देऊन सह्रदय सत्कार करण्यात आला. मातृ शक्ती सदैव पूजनीय व सन्माननीय आहे तशीच ती शक्ती, युक्ती, भक्ती, यश, कीर्ती, लक्ष्मी, आणि समृद्धी या गुणांनी युक्त अशी बलशाली अष्टभुजा आहे. ज्यांच्या शक्तीचा जागर व्हावा आणि नेतृत्व अधिक शक्ती संपन्न व्हावे.त्यांचा योग्य सन्मान व्हावा. ज्यांनी स्वतःला खपवून समाज जीवन पल्लवीत व सुखद करण्याचा प्रयत्न केला. समाजातील भगिनिंच्या सुप्त गुणांना वाव देऊन समाजाचे हित साधण्याचे धनुष्य उचलले अशा या कर्तृत्ववान भावसार समाजातील कमल अलोने, ऍड कल्पना जांगडे, प्रगती सुत्रावे या मातृशक्तीचा भव्य सत्कार करण्यात आला. भावसार समाजाच्या महिला अध्यक्ष योगिता धनेवार,अभिलाषा मैंदळकर, मीनाक्षी अलोणे, प्रीती लखदिवे, हेमांगी साधनकर, पूजा बर्डे, आरती गोजे, वैशाली भागवत, वासंती लखपती, अर्चना आलोने, यांनी सत्कार मूर्तीचे अभिनंदन केले.