श्री केतेश्वर स्वामी महाराज जयंती निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

0
19

 

चंद्रपूर :- श्री केतेश्वर स्वामी महाराज जयंती निमित्त समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लक्ष्मी नारायण मंदिर जवळ सपत्नीक शोभयात्रेचे स्वागत केले. यावेळी सुनिल वासमवार, पंकज जोरगेवार, अजय चंदावार, नरेंद्र जोरगेवार, सुरेश पुट्टेवार, मोहन जवाडे, गुरुदेव पार्लेवार, नकुल वासमवार, प्रशांत जोरगेवार, गजानन मंचलवार, गौरव जोरगेवार, केतन जोरगेवार, सोनु दर्शनवार, राजु पुटटेवार वर्षा गयनेवार, सविता सुलभेवार, चैताली पदमगीरवार आदींची उपस्थिती होती

बुरुड समाजाचे आराध्य दैवत महान तपस्वी श्री केतेश्वर स्वामी महाराज यांची जयंती समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. मिलन चौक येथील केतेश्वर मंदिर येथून या शोभायात्रेला सुरवात झाली. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत जटपूरा गेटला वळसा घालुन पुन्हा केतेश्वर मंदिर येथे पोहचली. दरम्यान लक्ष्मी नारायण मंदिर जवळ सदर शोभायात्रा पोहचली असता आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत करत श्री केतेश्वर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला मार्लापण करून नमन केले. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here