चंद्रपुर : महाराष्ट्र सरकारने शिवकालीन शस्त्र-अस्त्र युद्धकला आवाश्याचा राष्ट्रीय क्रीडा खेळात समावेश केला आहे. या कलेची १८ वी राष्ट्रीय आखाडा स्पर्धा-२०२३ महाराष्ट्रातील सातारा जिल्हयात आयोजित केली गेली आहे. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली… या राष्ट्रीय स्पर्धेत के. जी. एन. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर व चंद्रपूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत ३ सुवर्ण पदके व ५ कांस्य पदके पटकावली, ओम गोगलिया, मंथन शृंगारपवार आणि मोहम्मद साद सिद्दीकी यांनी सुवर्ण पदक पटकावले तसेच मुरसलीन मन्सूरी, वंश झिलकलवार, सर्वेश नन्नेवार, तन्मय शिल आणि आले मुस्तफा यांनी कांस्यपदक पटकावले.
शाळेचे संस्थापक महमूद आसिफ सर, अध्यक्ष गुलाम फरीद, बल्लारपूर शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वाघमारे, चंद्रपूर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता करमणकर यांनी सर्व पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेतील सर्व मुलांसमोर पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच राष्ट्रीय स्तरावर विजयी झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळेचे क्रीडा प्रशिक्षक रमेश नातरगी सर यांनी विद्यार्थ्यांना कठोर प्रशिक्षण दिले.