चंद्रपुर :- येथील मुल शहर हे तालुक्याचे मुख्यालय असुन शहरातील जनतेसोबत तालुक्यातील नागरिक सुद्धा हजारोंच्या संख्येने शहरात कार्यालयीन कामे, बाजार, कापड व धान्य खरेदी विक्री इत्यादी कामानिमित्त शहरात येत असून त्यांना खुप त्रास सहन करावा लागत असल्यामुळे सदर समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख नितिनभाऊ मत्ते यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा प्रमुख कमलेशभाऊ शुक्ला यांच्या नेतृत्वात तसेच चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या उपस्थित पोंभूर्णा तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार, मुल तालुका प्रमुख आकाश कावळे, शहर प्रमुख विशाल नागुलवार, बल्लारपुर शहर प्रमुख मनजीत सिंग,उपतालुका प्रमुख संतोष इप्पलवार, अशोक गगपल्लीवार, राजू रायपुरे, चिकू निकोड़े, विनीत वाकडे, मयूर ठाकरे, विवेक सोनेकर, अविनाश कन्नाके यांनी मुल नगरपरिषदचे मुख्याधिकारी यशवंत पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शासनाचा लाखो रुपयाचा निधी मुल शहराच्या विकासकामे व सौंदर्य वाढविण्याच्या कामात खर्च झालेला असून त्याचा फायदा शहरातील तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना होताना दिसून येत नाही आहे. शहरातील व बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांना शुद्ध व ठंड पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी गांधी चौक व पंचायत समिती या परिसरात आरो मशीन बसविण्यात आले पण त्या मशीन अल्पवधीतच बंद पडून आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
मुल शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडावी, यासाठी शहरातील प्रत्येक मुख्य ठिकाणी इरिकेशन फाउंटनची उभारणी करण्यात आली. परंतु ठराविक ठिकाणी काही दिवसांसाठी सुरू करण्यात आले, पण आजच्या स्थितीत शहरातील संपूर्ण इरिकेशन फाउंटन बंद स्थितीत आहे.
पाण्याचा अपव्यय होऊ नये व सर्वांना पाणी मिळावे,याकरिता मुल न. प. ने प्रत्येक घराच्या नळाला मीटर लावण्यात आले. परंतु लावण्यात आलेले मीटर अजून पर्यंत सुरूच करण्यात आलेले नाही.
शहरातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था व्हावी, याकरिता रस्त्यालगतचा सर्व नालीचे बांधकाम पूर्ण करुन त्यावर चेंबर लावण्यात आले, पण आजच्या स्थितीत लावण्यात आलेले चेंबर प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे ते जागोजागी फुटलेले असून काही ठिकाणचे चेंबर पूर्णपणे गायब झालेले आहे. त्यापासून लहान मुलांसोबतच जनावरांच्या जीवितास सुद्धा याचा धोका निर्माण झालेला आहे.
संपूर्ण देश हागणदारी मुक्त करण्याचे मा. पंतप्रधान यांचे स्वप्न असून त्या दृष्टीने प्रशासन स्तरावर योग्य प्रयत्न करून न. प. मुल कडून शहरातील व बाहेरगावावरून येणाऱ्या जनतेसाठी गांधी चौक मुल गुजरी चौक मुल बाजार रस्त्यावर सुलभ शौचालयाची बांधणी करावी.
सदर संपूर्ण समस्या या जनतेशी निगडित असून या सेवा अतिआवश्यक आहेत, याबाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ मार्गी लावण्यात याव्या अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्यात येण्याचा इशारा देण्यात आला.