उर्जानगर ग्रा. पं. ला ग्राम विकास अधिकारी असताना देखील चार्ज मात्र ग्राम सेवकाला का ?
चंद्रपुर :- येथील उर्जानगर ग्रा. पं. च्या कामकाजात अनियमितता सुरु असल्यामुळे नियमबाह्य चार्जवर असलेले ग्राम सेवक खोब्रागडे यांच्या कडील चार्ज तात्काळ काढून नेमणुकीनुसार उर्जानगर ग्रा. पं. ला असलेले ग्राम विकास अधिकारी वेस्कडे यांना चार्ज देण्यात येण्यासंदर्भात तसेच ग्राम सभेत नामंजूर झालेल्या अवाढव्य खर्चाची चौकशी करण्याकरीता ग्रामस्थाची चौकशी समिती नेमण्याची मागणी भिम बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शैलेन्द्र शेंडे, चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, उर्जानगर ग्रा. पं. माजी सरपंच देविदास रामटेके, उर्जानगर म. गां. तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष रमेश राऊत व सामाजिक कार्यकर्त्ते पुरुषोत्तम आवळे यांनी चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
उर्जानगर ग्रा. पं. महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्पन्न व चंद्रपुर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रा. पं. असून या ग्रा. पं. ला ग्राम विकास अधिकाऱ्याची पोस्टिंग असताना नियमानुसार ग्रा. पं. ला ग्राम विकास अधिकारी वेस्कडे म्हणून कागदोपत्री नियुक्ति दिलेली सुद्धा आहे. परंतु चंद्रपुर संवर्ग विकास अधिकारी यांनी वेस्कडे यांना इतरस्त्र पाठवून ग्राम सेवक खोब्रागडे यांना बेकायदेशीर उर्जानगर ग्रा. पं.चार्ज दिलेला असून सदर बाब नियमबाह्य पद्धतिने चंद्रपुर संवर्ग विकास अधिकारी यांनी वैयक्तिक व आर्थिक स्वार्थापोटी केलेली खेळी आहे.
उर्जानगर ग्रा. पं. ला चार्जवर असलेले ग्राम सेवक सचिव खोब्रागडे यांनी ग्रा. पं. च्या अवाढव्य केला असून गावातील ग्रामस्थाकडून दि. 31ऑगस्त 2023 च्या झालेल्या ग्राम सभेत सदर अवाढव्य खर्चास नामंजूरी देवून ग्रामस्थाची चौकशी कमेटी नेमण्याबाबत ग्राम सभेत ठराव सुद्धा पारित करण्यात येवून यासंदर्भात दि. 06 सप्टेबर 2023 ला चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी गावकरी नागरिकांनी तक्रार दिली. परंतु आजपावतो कुठलीही कमेटी नेमण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकरी नागरिकांना असा संशय आहे कि, सदर खर्च नियमबाह्य असून या अवाढव्य खर्चात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार चंद्रपुर संवर्ग विकास अधिकारी यांच्या आशिर्वादाने झालेला आहे. त्यामुळे ग्रामसेवक, सचिव खोब्रागडे यांच्याकडे असलेला चार्ज तात्काळ काढून ग्रा. पं. पोस्टिंगनुसार ग्राम विकास अधिकारी वेस्कडे यांना चार्ज देण्यात यावा आणि दि. 31ऑगस्ट 2023 च्या ग्रामसभेत नामंजूर झालेल्या अवाढव्य खर्चाची चौकशी व पडताळणी करीता ग्रामस्थाची चौकशी कमेटी नेमण्यात यावी.
तसेच ग्रा. पं. झालेल्या अवाढव्य खर्चाची चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी. अन्यथा गावकरी नागरिकांच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.