पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर:- जटपुरा प्रभाग क्र. ८ येथील सपना टॉकीज जवळ नागरिकांच्या सुविधेकरिता महर्षी श्री वाल्मिकी समाजाच्या सभागृहाचे बांधकाम कॅबिनेट व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नुकतेच मंजूर केले. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे या बांधकामाला निधी उपलब्ध झाल्याने सपना टॉकीज मागे जटपुरा गेट येथे भूमिपूजन करण्यात आले.महर्षी वाल्मिकी हे एक महान लेखक आणि ऋषी होते, रामायण हे महाकाव्य ज्यांच्या पवित्र लेखणीतून उमटले असे हे महाकवी. श्रीरामाची कथा सांगणारे रामायण संस्कृतमध्ये लिहिले गेले होते आणि त्यात २४,००० श्लोक आहेत. अशा या पूज्य संताच्या स्मरणार्थ समाज भवनाचे भूमिपूजन हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष भाजपा (श),डॉ. मंगेश गुलवाडे, छबुताई वैरागडे विशाल निंबाळकर राहुल घोटेकर भाजपा नेते तथा मनपा सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलतांना भाजप महानगराध्यक्ष राहुल पावडे म्हणाले,लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून जनतेच्या मागणीवर या सभागृहाचे निर्माण होणार आहे.समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करणे हा भाजपाचा उद्देध आहे.सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय सुधीरभाऊंचे आहे.यामुळेच ते प्रत्येकांशी थेट संवाद साधतात.या नंतरही विकासाचा झंजावात सुरू राहील अशी माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाचे आयोजन सपना टॉकीज परिसरातील वाल्मिकी समाजाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमोद शिरसागर, रवी लोणकर, विठ्ठल डुकरे, धनराज सावरकर, सुनील डोंगरे, सत्यम गाणार, लखनजी, भैय्याजी बुलगज, रमेश सरसर, अनिलजी, अशोक सर, अशोक हटवाल, संजय छप्पर, विनोद राज खोडे, अमोल मते आदींची उपस्थिती होती.