चंद्रपुर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार..!
चंद्रपुर :- येथील चांदा क्लब ग्राउंड लगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या VIP गेस्ट हॉऊस येथे दि.28 ऑक्टोबर 2023 रोज शनिवारला ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या सूचनेनुसार व राष्ट्रीय उपाध्यक्ष आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणीची बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या जिल्हा कार्यकारणीतील रिक्त पदांच्या नियुक्तिबद्दल पदाधिकाऱ्यामध्ये चर्चा करुन सर्वानुमते जिल्हा सचिवपदी मुन्ना इलटम यांची निवड करण्यात आली.तसेच जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी अँड. रवि धवन यांची तर जिल्हा संघटकपदी दिपक नन्हेट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, जिल्हा संपर्क प्रमुख कमलेश शुक्ला, जिल्हा उपाध्यक्ष संजयकुमार शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद धिमान, जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र पुणेकर, जिल्हा मिडिया प्रमुख धम्मशील शेंडे, सदस्य राजू रायपुरे, अविनाश ऊके आदींनी नियुक्तिबद्दल अभिनंदन केले.