चंद्रपूर : येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित “भाऊचा दांडिया” महोत्सवात शनिवारी (२२ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी चित्रपटातील डायलॉग बोलून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या महोत्सवात शनिवारी प्रथमेश परब यांनी उपस्थिती दर्शवून दांडिया नृत्य उत्सवाची रंगत आणखी वाढविली. प्रथमेश परब यांनी चंद्रपूरकरांना भेटून आनंद व्यक्त केला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोठी गर्दी केली. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्याचा सत्कार केला.