शहीद भूमी जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे 1857 च्या स्वातंत्र्य लढयातील शहीद क्रांतिवीर यांना अभिवादन करण्या साठी दरवर्षी चंद्रपूर,गडचिरोली तथा छतीसगढ,आंध्रप्रदेश इथून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव येत असतात.या बांधवांनी रविवारी शाहिद पुलेश्वर शेडमाके यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.अनेक आदिवासी संघटनांनी रॅलीने मार्गस्थ होत अभिवादन केले.दरम्यान आदिवासी समाज बांधवांची दखल घेत
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार (वने,सांस्कृतिक कार्य, मत्स व्यवसाय तथा पालक मंत्री चंद्रपूर/वर्धा) यांच्या मार्गदर्शनात येथील गिरणार चौकात भोजन दान करण्यात आले.रॅलीने येणाऱ्या सर्व आदिवासी बंधू भगिनी व युवा विद्यार्थी यांना पुरी भाजी व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर राहुल पावडे, माजी जिल्हाध्यक्ष मंगेश गुलवाडे,ब्रिजभूषण पाझारे,रविंद्र गुरणुले,राजू गोलीबार,अनिल डोंगरे,अरुण तिखे,भाजपा आदिवासी जिल्हाध्यक्ष धनराज कोवे,जील्हाध्यक्ष ग्रामीण ऍड. हरीश गेडाम,शुभम गेडाम,अरविंद मडावी, माजी नगर सेविका माया उईके,शीतल आत्राम,ज्योती गेडाम,विलास मसराम,गणेश गेडाम,अजय सरकार,सविता कांबळे,शीला चव्हाण, पुष्पा उराडे,वनिता डुकरे,दिनकर सोमलकर,विठल डुकरे,संदीप आगलावे,सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर,विनोद शेरकी,रुद्र्णारायन तिवारी,पूरषत्तम सहारे,चांद सय्यद,सुनील डोंगरे,कमलेश आत्राम,अनिल सुरपाम, सत्यम गाणार,प्रभा गुडधे,वंदना संतोषवार,सिंधू मधुकर राऊत,विक्की मेश्राम,राजेंद्र खांडेकर,तृष्णा गेडाम,राहुल काळे,राकेश आत्राम,महेश शिडाम,नितीन कुळसंगे, शकील शेख,जाहीर खान,अमोल नगराळे,मनोज पोतराजे,महेश झिटे, रामकुमार अकापल्लीवार,भानेश मातंगी,
आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भाजपा जिल्हाध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली
शाहिद भूमीवर नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यास एकच गर्दी केली.यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी शहीद भूमी येथील शहीद शेडमाके यांच्या स्मारकाला व अमर पिंपळ वृक्षाला पुष्पचक्र पुष्प अर्पण केले. तथा जयघोष करून श्रद्धांजली अर्पण केली .