चंद्रपूर : सन 1857 च्या लढ्यातील महानायक ज्यांनी अगदी कमी वयात इंग्रजांच्या जुलमी शासनाचा विरोध करून त्यांना सडो की पळो करणाऱ्या क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या 166 व्या शहीद दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा शहर च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील कारागृह येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना अभिवादन करण्यात आले. यावेळेला आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला पदाधिकारी तब्बसुम शेख, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या, जयदेव देवगडे, सुधीर पाटील, अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, अजय बाथव, भिमराज बागेसर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.