लखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तीगीतात चंद्रपूरकर तल्लीन नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांना महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आले चांदीचे नाणे

0
16

श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तिमय गीतांनी रंगत भरली. यावेळी लखबिर सिंग लक्खा यांनी गायलेल्या भक्तीगीतात चंद्रपूर तल्लीन झाला.

काल गुरुवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांनी अनुभवली यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर चंद्रपूरातील स्थानिक कलाकारांनी व शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य जल्लोष हा कार्यक्रम सादर केला.
तर सायंकाळी 9 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या जगप्रसिद्ध देवी गीत जागरणाकर लखबिर सिंग लक्खा यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी माता भक्त हजारोच्या संख्येने महोत्सव स्थळी जमा झाले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्यानी किशोर जोरगेवार, महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवण सराफ, सदस्य बलराम डोडाणी, कुक्कु सहाणी, मिलींद गंपावार, संजय हरणे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी लखबिर सिंग लक्खा यांना मातेची चुनरी, मातेची मुर्ती आणि शाल श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले. आमच्या विनंतीला मान देत आपण येथे आलात. या महोत्सवात रंगत भरली असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आये नौरात्रे माता के या भक्तीगीताने लखबिर सिंग लक्खा यांनी कार्यक्रमाला सुरुवात करताच संपूर्ण परिसरात भक्तीचा महासागर अवतरला.
तर माता महाकालीच्या आरती आणि भजनाने महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरवात करण्यात आली यावेळी 11 वाजता भावना तन्नीरवार यांचा प्रवचन कार्यक्रम पार पडला, त्यानंतर नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने चांदिचे नाणे देण्यात आले. नंतर कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

*उद्याचे कार्यक्रम*
सकाळी 9 वाजता माता महाकाली आरतीने महोत्सवाला सुरवात होणार आहे. दुपारी 10 वाजता ग्रामगीता महिलोन्नती या विषयावर बाल किर्तनकार साक्षी अवतरे कीर्तन सादर करणार आहे. 11 वाजता प्रतिमा स्वरुप देवता या विषयावर स्तंभ लेखिका मुर्तीशास्त्र अभ्यासिका डॉ. रमा गोलवकर यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 12.30 वाजता विठ्ठल दिंडी तसेच चिंगारी हु मै या पथनाट्याचे सादरीकरण एकता बंडावार व त्यांचा समुह सादर करणार आहे. दुपारी 2 वाजता लोकजागृती नाट्य मंचाच्या वतीने गोंडवाना के महायोध्दा शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर नाटक प्रस्तृत करण्यात येणार आहे. 5 वाजता माता महाकालीची आरती होईल त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here