चंद्रपूर :- भाजप महानगर अल्पसंख्यांक आघाडीतर्फे लोकमान्य टिळक शाळा येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर भाजप महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी चंद्रपूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी तर्फे ईद-ए-मिलाद निमित्त रॅलीचे स्वागत व बुंदी पाणी बॉटल वाटप करण्यात आले.ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक लोकमान्य शाळे जवळ येताच चंद्रपूर भाजपा अल्पसंख्यांक आघाडी तर्फे मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांनचे स्वागत व बुंदी पाणी बॉटल वाटप करण्यात आले. तसेच ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गांधी चौक मार्गक्रमण करीत जटपुरा गेट जवळ मिरवणूकीचे समापन करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे डॉ.मंगेश गुलवाडे ब्रिजभूषण पाझारे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अमित शेख भाजप महानगर सचिव चांद सय्यद बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार सुरज पेदुलवार प्रज्वल कडू शकील शेख जाहीर रजा रफिक शेख शाहरुख खान सोहेल शेख तरबेज पठाण अरबाज खान आसिफ पठाण व मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.