जिवती तालुक्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन हाताला आलेले पीक गेले .पांढरी माशी व मोजक आणि खोंड आळी लागल्या मुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे .त्यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी संकट आले आहे .जिवती तालुक्यातील शेतकरी हा हताश झाला आहे आणि पीक गेल्यामुळे चिंतेत आहे. तरी शेतकऱ्याचे कैवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे सरकार ऐक रुपयात विमा काढलेला आहे. त्यांना विमा कंपनीने लाभ द्यावा व ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांना एकरी 50000 रुपये अनुदान देण्यात यावे असे निवेदन तहसीलदार जिवती यांना शिवसेनेच्या जिवती तालुका प्रमुख भरत बिरादर यांचा वतीने देण्यात आले. शिवसेना तालुका संघटक गणेश पवार,मुनजाजी बर्वे,कपिल राठोड, चंद्रकांत पुकट्वाड,राजू कुमारे,अरुण भोगे,जालीम कोडपे.उपस्थित होते.