प्रत्येक घरी मेरी माटी मेरा देश अभियान मा.पालकमंत्री,माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री,मा.आमदार,जिल्हाधिकारी यांचा सक्रिय सहभाग

0
18

चंद्रपूर २३ सप्टेंबर – चंद्रपूर शहरात मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियान अत्यंत यशस्वी ठरले असुन मा.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष मा. हंसराज अहीर, मा.आमदार किशोर जोरगेवार ,जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सक्रिय सहभाग दर्शवित अमृत कलश यात्रेत माती अर्पण करून अभियानात सक्रिय सहभाग दर्शविला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्ताने मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानाचा दुसरा टप्पा १ सेप्टेंबरपासुन राबविण्यात येत असुन याअंतर्गत देशस्तरावर अमृत कलश यात्रा काढली जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ३ अमृत कलश रथांद्वारे अमृत कलश फिरविण्यात येत असून नागरिकांद्वारे उत्स्फुर्तपणे माती / तांदुळ अर्पण केले जात आहेत.
चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अमृत कलश रथ त्यांच्या दारी येताच सहपरिवार यात्रेचे स्वागत केले व माती अर्पण करून शहीदांना वंदन केले,त्याचप्रमाणे पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष यांनीही सहपरिवार अमृत कलशास माती अर्पण केली. शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या घरी अमृत कलश येताच पुजन करून माती अर्पण केली व यांनी यात्रेचे नियोजन जाणुन घेतले. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनीही त्यांच्या परिसरात अमृत कलश येताच शहिदांना वंदन करून माती / तांदुळ अर्पण केले.
अमृत कलश रथांचे उदघाटन १५ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले होते. संपुर्ण देशभरात शहीद वीरांना मानवंदना देण्यासाठी मेरी माटी  मेरा देश अभियानाचा दुसरा टप्पा सुरु असुन या अभियानात चंद्रपूर शहरातील नागरीकांचा सहभाग असावा यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालीकेतर्फे  झोननिहाय ३ अमृत रथ तयार करण्यात आले आहे. घराघरातुन छोट्या कलशांद्वारे संकलित माती व तांदूळ एकत्र आणून मोठ्या कलशात ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्हास्तरावरुन मुंबई व नंतर दिल्ली येथे पाठवुन हुतात्मा स्मारकाजवळ ‘अमृत वाटिके’ मध्ये विसर्जित केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here