HSRP नंबर प्लेट लावण्याच्या नियमात सुधारणा करून जनतेला होणारा त्रास कमी करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन.!

0
3

 

संपूर्ण भारतामध्ये एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याकरिता ऑनलाईन अर्ज करून शासनाने ठरवून दिलेल्या सेंटरवर तारीख व वेळ घेऊन नंबर प्लेट लावण्यात येते. शासनाने ठरवून दिलेले सेंटर फार कमी प्रमाणात आहे तालुकास्तरावरून सुद्धा लोकांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याकरिता जिल्हास्तरावर यावे लागत आहे एक ते दीड महिन्यानंतर च्या तारखा ऑनलाईन नंबर लावल्यावर मिळत आहे ऑनलाइन नंबर लावून घेतलेल्या तारखेच्या दिवशी एखाद्याला अत्यावश्यक काम आले आणि तो दुसऱ्या दिवशी नंबर प्लेट लावण्याकरिता सेंटरवर गेल्यास नंबर प्लेट लावून देण्याकरिता नकार दिला जातो आरटीओ शी बोला मगच लावून देऊ किंवा पुन्हा रीशेडूल करा म्हणून सांगितल्या जाते रीशेड्युल करणे करिता गोरगरीब जनतेला एखाद्या सायबर मध्ये जाऊन रीशेडूल करताना आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे याचा नाहक त्रास सर्वसामान्य गरीब जनतेला सहन करावा लागत आहे.

त्यामुळे जनतेला होणारा त्रास कमी करणे करिता खालील प्रमाणे नियमात सुधारणा करणेस्तव शासनास कळवणे करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष श्री सुनील काळे यांचे नेतृत्वात श्री किरण मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

1) एखाद्या व्यक्ती दिलेल्या तारखेला न पोहोचल्यास त्याला दुसऱ्या दिवशी नंबर प्लेट लावून देण्याबाबत सर्व सेंटरला सूचना देण्यात याव्या.

2) एच एस आर पी नंबर प्लेट लावून देण्याकरिता सेंटरची संख्या वाढविण्यात यावी प्रत्येक तालुका स्तरावर सुद्धा सेंटर उपलब्ध करून द्यावे.

3) एच एस आर पी नंबर प्लेट लावून देण्याकरिता चंद्रपूर शहरात सुद्धा अध्यक्ष सेंटर उपलब्ध करून द्यावे.

4) रिसेडुल करताना एक ते दीड महिन्याच्या अंतरावर तारखा दिल्या जातात त्याचा कालावधी कमी करून तारीख गेल्यानंतर रिसेड्युलमध्ये जवळच्या तारखा उपलब्ध करून देण्यात याव्या.

 

एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भात वरील प्रमाणे जनतेला होणाऱ्या त्रासाच्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2025 रोजी विशेष बैठकीचे आयोजन करून सदर समस्याचे निराकरण करण्याचे आश्वासन माननीय श्री किरण मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांनी दिले यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष श्री सुनील काळे यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव श्री संभाजी खेवले व सामाजिक कार्यकर्ते श्री राकेश नाकाडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here