चंद्रपुर :- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला असला तरी महाराष्ट्रात शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जात असल्यामुळे चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने भद्रावती नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्याला माल्यार्पण व पूजा अर्चना करुन मिठाई वाटप करीत मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा कामगार जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, कामगार जिल्हा उपाध्यक्ष बंटी हेमके, चंद्रपुर तालुका संघटक संजय शिंदे, चंद्रपुर उप तालुकाप्रमुख विक्की महाजन, चंद्रपुर उपशहर प्रमुख विश्वास खैरे, भद्रावती कामगार तालुका प्रमुख योगेश म्यानेवार, शहर प्रमुख विकास मड़ावी, वाहतुक शहर प्रमुख बाळू पतरंगे, युवासेना उप शहर प्रमुख विवेक दुर्गे, महिला उप शहर प्रमुख राधाबाई कोल्हे, युवासेना उप शहर प्रमुख विवेक दुर्गे, माजी नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, राजू रायपुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
पुणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८६९ मध्ये शिवजयंती उत्सव करून लोकांमध्ये एकजुटता येऊन राष्ट्रप्रेम जागृत करण्याची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि इतिहासाचा सोनेरी दिवस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.