मनवर शेख
ब्यूरो चीफ़
हिंगणघाट
समुद्रपूर:- परभणी महाराष्ट्र मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकुर्ती पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड असामाजिक तत्व करून करण्यात आली या कृतीच्या विरोधात स्थानिक संविधान प्रेमी जनतेने तिथे आंदोलन पुकारले असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याऐवजी आंदोलकांवर अश्रूधुळ सोडून त्यांना अमानुष व पाषवी मारहाण करण्यात आली. निषेध करणाऱ्या शांतिप्रिय संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकत्यास पोलिसाद्वारे लॉकअप मध्ये कोंडून बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. तसेच शांतप्रिय आंदोलकांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून गुन्हे नोंदविण्यात आले. हा सर्व प्रकार लोकशाहीला व मानवी मूल्यांना पायदळी तुडवणारा आहे. याचा निषेध.
तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा जाहीर निषेध.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबत आक्षेपार्य व्यक्तव्य केल्याबाबत निषेध.
तसेच ईव्हीएम द्वारे जनमताची चोरी होत असल्याचा संशय दूर करण्याकरता पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बॅलेट पेपरवर होण्याकरिता निवडणूक आयोगास कळविणे.
या सर्व बाबींचा विचार करता संविधान रक्षक जागरुक नागरिक मंच, समुद्रपूर मागण्याचे निवेदन मा. तहसीलदार साहेब यांच्यामार्फत शासनास सादर केले. या संवीधानिक मागण्यांचा मानवी व लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार होऊन कार्यवाही व्हावी.
असे आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदन कर्ते: श्री सुरेश जी भगत, श्री राहुलजी लोहकरे, श्री डॉ. रामकृष्णजी खुजे,श्री गुनवंतजी कोठेकर,श्री प्रकाश नीखाडे,श्री रवींद्र लांबट सर,श्री नितीनजी सरोदे सर,श्री सोनू मेश्राम,श्री भोलाभाऊ भोयर,श्री देवरावजी खोब्रागडे,श्री संजयजी चाटे,श्री परेश बाभुळकर,राष्ट्रपालजी कांबळे,शेख मनवर शेख सुभान,श्री सुनील मांडवकर,कमलाकरजी कांबळे,पंकज थूल, मनोहर चौधरी,राजकुमार रामटेके,विनोदकुमार जागलन,विनोद थूल,नाना कुत्तरमारे,सिद्धार्थ शेळके,मुरलीधर शेळके,यादव खातदेव,प्रशांत भगत,अरुण नन्नावरे,अशोक वानखेडे, मयूरकांत बोरकर,राजकुमार वाघमारे, फकीरा ढोणे, संजय गेडाम, अनिल भिसेकार, रमेश गाठले, राजकुमार शेळके इत्यादींची उपस्थिती होती.