चंद्रपुर : स्त्री तारिणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आमदार श्री. किशोर भाऊ जोरगेवार यांना चंद्रपुर जिल्हे चे रहवासी ज्यांना पुणे जाण्या साठी बसचा प्रवास त्रास दायक होत आहे म्हणून स्त्री तारीनी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सदस्य लोकांच्या हितासाठी नेहमी तथपर असतात एका मोठ्या अपेक्षेने एक अतिशय गंभीर प्रकरण घेऊन आमदार साहेबांकडे नेहमी प्रवास करणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी चंद्रपूर टू पुणे मार्गावरील ट्रेन सुरू करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली..!
त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात मुलींचे लैंगिक शोषण आणि स्त्रियांचे लैंगिक अत्याचारात भरपूर प्रमाणात वाढ झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. या कार्यक्रमात स्त्री तारीनि बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष ॲड . विणा बोरकर गाडगे, सौ अंजलीताई मेश्राम सौ. वंदनाताई मनपे , सौ संतोषी चव्हाण, सौ. पुजताई शेळके सौ.लता खनके, हेमलता खोब्रागडे, राखी नगराळे, शिल्पा शेळके, उपस्थित होते.