चंद्रपुर: डी. आर. सी. डब्ल्यू. सी. एल. कॉलनी क्रमांक ४ येथे स्त्री तारिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक एड्स दीन व सप्ताहाअंतर्गत एड्स जाणीवजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण आणि दीप प्रज्वलन करून मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.विणा बोरकर गाडगे, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती राखी देशमुख सौ. माधुरी बावणे उपस्थित होते. सौ रंजीता फुलझले यांनी आपल्या शरीराची निघा कशी राखावी यावर मार्गदर्शन केले तसेच सौ. माधुरी बावणे यांनी महिलांना एड्स जाणीव जागृती या विषयावर माहिती दीली व एड्स हा रोग कसा होतो याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे एड्स झालेल्या व्यक्तीला कोणतेही भेदभाव न करता सन्मानजनक वागणूक द्यावी असे सांगितले. एड्स झालेल्या व्यक्तीने न घाबरता योग्य उपचार केला तर त्यांचे मनोबल वाढून तो सामान्य माणसासारखा समाजात जीवन जगू शकतो तसेच सौ. राखी देशमुख यांनी गुप्तरोग आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबद्दल माहिती दिली. आणि एच. आय. व्ही. एड्स कसा पसरतो याविषयी माहिती दिली. ॲड.विणा बोरकर गाडगे त्यांनी एड्स व्यक्तींना आपल्या मूलभूत अधिकारानुसार समानतेचा अधिकार असतो आणि त्यांना सन्मानाने वागविले पाहिजे असे मार्गदर्शनातून सांगितले. संचालन संस्थेचे सदस्य सौ स्वाती नगराळे यांनी केले तसेच आभार सौ पपीता तामगाडगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव सौ अंजली ताई मेश्राम,हेमलता खोब्रागडे ,वंदनाताई मनपे, नीलिमा पाटील, लक्ष्मी तावडे, राणी नीमेकर, जोशीला ढोके, शितल बावनकर, पौर्णिमा उराडे,तेतरी यादव, उपस्थित होते.