मतदान हा लोकशाहीने आपल्याला दिलेला मौलिक अधिकार आहे. या अधिकाराचा वापर विकासासाठी, रचनात्मक कार्यासाठी, लोकहीत जपणाऱ्या सरकारच्या स्थापनेसाठी,विकासासाठी झटणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड होण्यासाठी होणे अपेक्षित आहे. म्हणून प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजावावा असे आवाहन चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. गेली पाच वर्षे या मतदार संघाचा विकास हेच ध्येय उराशी बाळगून आपण कार्यरत आहो, मतदार बांधवांनी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताचा कौल बहाल करून विधानसभेत पाठवावे असे आवाहन किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. आराध्य दैवत माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी 250 कोटी रु चा निधी, पवित्र दीक्षा भूमीच्या विकासासाठी 56.69 कोटी रु चा निधी मी मंजूर करविला. रस्ते, पूल बांधकामासाठी मोठया प्रमाणावर निधी खेचून आणला. विद्यार्थांनीना सायकलींचे वितरण, महिलांना शिलाई मशीनचे वितरण आपण केले. अम्मा का टिफिन या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, निराधारांना टिफिन वितरण असे लोकहिताचे उपक्रम आपण राबविले. विकास प्रकिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या मतदार संघाचा विकास अधिक वेगाने व्हावा यासाठी पुन्हा एकदा मतरूपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.