चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रेतून मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे आज दिसून आले. बंगाली कॅम्प परिसर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेत पाच वर्षांतील कामांचा आढावा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रचाराचा वेग वाढला आहे. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून आपली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून सकाळी पदयात्रा आणि संध्याकाळी छोटेखानी बैठका असा नियमित प्रचार कार्यक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आखला असून यातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रचारादरम्यान ते मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासाचे व्हिजन लोकांना पटवून देताना दिसून येत आहेत. त्यांच्या या प्रचाराला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ते आपुलकीने भेटत असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांबाबत त्यांना माहिती देत आहेत. प्रचारादरम्यान बोलताना ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण चंद्रपूरात विकासकार्य केले आहे. नागरिकांचे आलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे.
आपण कार्यालयात कर्तव्य सेतु केंद्र सुरू केले असून या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता यांचे शासकीय योजनांची कागदपत्रे निशुल्क काढून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मागील पाच वर्षांत आपण सतत नागरिकांच्या संपर्कात राहिलो असून, याचा फायदा प्रचारादरम्यान मिळत असल्याचे ते म्हणाले.