चंद्रपूर- ब्रिटीश राजसत्तेला आव्हान देत सळो की पळो करून सोडणारा आदिवासी योध्दा शहीदवीर बाबुराव पुलेसूर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हा कारागृह परिसरातील शहीद स्थळावर जावून या शहीदवीरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
दि. २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी शहीद दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास समाजाचे युवा नेते गणेश गेडाम, कमलेश आत्राम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, प्रिया आत्राम, गौतम यादव, राजु येले, संजय खनके, राजवीर चौधरी, राहुल सुर्यवंशी, चेतन शर्मा, सुदामा यादव, अनिल सुरपाम, दिवाकर मेश्राम, विलास मसराम, रवी मेश्राम, विठ्ठल कुमरे, आकाश चंदनखेडे, ओमकार गेडाम, रामप्रवेश यादव, साईराम मडावी, अनिल सिडाम, अंजली सुरपाम, राकेश गेडाम, प्रफुल मडावी, मनोज गेडाम यांचेसह समाजाचे पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित हो
ते.