महावितरणच्या बाह्य स्त्रोत कर्मचारी मिथुन भगवान गायकवाडवर फसवणुकीचा आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

0
14

चंद्रपूर (जिवती): महावितरण कंपनीच्या बाह्य स्त्रोत कर्मचारी मिथुन भगवान गायकवाडवर विज ग्राहकांकडून पैसे घेऊन वीज बिलाचा भरणा न करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बळीराजा पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ईश्वर अर्जुनजी ठाकरे यांनी दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी जिवती पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, मिथुन भगवान गायकवाड यांनी विविध ग्राहकांकडून त्यांच्या वीज बिलाच्या नावाखाली पैसे घेतले, परंतु महावितरणच्या खात्यात ही रक्कम जमा केली नाही. या फसवणुकीमुळे महावितरणला लाखों रुपयांचे नुकसान झाले असून, ग्राहकांचे वीज बिल अजूनही थकबाकीदार आहेत.

 

शिकायतकर्त्याने सादर केलेल्या माहितीनुसार, काही प्रमुख नावे आणि त्यांच्या थकबाकी रक्कमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

1. परवतराव अंजु कोटनाके (PD बिल) – ₹६९९०

 

 

2. अन्नाराव राणबा नामपल्ले (PD बिल) – ₹१३६०

 

 

3. नागेश अंगत गासले (PD बिल) – ₹३४००

 

 

4. दत्ता रामराव शिंदे (चालू बिल) – ₹१२००

 

 

5. सरपंच ग्रामपंचायत महापांढरवणी (चालू बिल) – ₹१००००

 

 

6. राजेंद्र रुपचंद राठोड (PD बिल) – ₹३३०

 

 

7. गणपती नामदेव राठोड (मीटर कॉस्ट) – ₹३०००

 

 

 

मिथुन भगवान गायकवाड हे जिवती महावितरण अंतर्गत ८४ गावांमध्ये कार्यरत आहेत, आणि त्यांनी अनेक इतर गावांमध्येही ग्राहकांकडून रक्कम घेतली आहे, परंतु ती महावितरणच्या खात्यात जमा केलेली नाही. या फसवणुकीमुळे महावितरणला आर्थिक फटका बसला असून, ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

ईश्वर ठाकरे यांनी पोलिसांकडे याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून इतर प्रभावित ग्राहकांचीही माहिती घेता येईल आणि त्यांच्या बिलांचे निपटारा होईल. त्याचबरोबर, अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये.

 

महावितरणच्या वाढत्या वीज दरांबाबत सामान्य नागरिकांमध्ये आधीच असंतोष आहे, आणि अशा आर्थिक गैरव्यवहारांमुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here