चंद्रपूर:- श्री माता महाकाली महोत्सवाच्या तयारीला वेग आले असून, ७ ऑक्टोबरपासून होणाऱ्या या महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्याची प्रक्रिया आज विधिवत सुरू झाली आहे. महाकाली मंदिराच्या पटांगणात महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे पूजन आज शुक्रवारी श्री महाकाली माता सेवा समितीचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल महाकाले, सचिव अजय जयस्वाल, विस्वत श्याम धोपटे, राजु शास्त्रकार याच्या सह इतर मान्यवरांची प्रामुख्यतेने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात ७ ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून आता पासूनच शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या महोत्सवात जगप्रसिद्ध कलाकार आपल्या कलेने मंत्रमुग्ध करणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध स्थानिक कलाकार सुद्धा आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.सदर कार्यक्रम महाकाली मंदिर जवळील पटांगणावर होणार असून, यासाठी येथे भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. आज विधिवत रित्या मंडप पूजन संपन्न झाले. यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचा मोठा प्रतिसाद महोत्सवाला मिळत आहे. आपल्या सहकाऱ्यांमुळेच महोत्सवाची भव्यता दरवर्षी वाढत आहे. यंदाही आपण अनेक नवीन कार्यक्रमांचा या महोत्सवात सहभाग केला आहे. आपल्याकडून आलेल्या सूचनांचीही दखल घेण्यात आली असून, त्यावर महोत्सव कमिटी काम करत असल्याचे यावेळी श्री माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे