महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याकरिता शासन प्रशासन आणखी बलात्कार होण्याच्या घटनेची वाट पहात आहे काय..? संतप्त महिला, राजुरा
ता. राजुरा- सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण देशभरात बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने गेल्या काही दिवसांत परराज्यातील कोलकत्ता येथील दुःखद घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील बदलापूर येथील झालेली घटना व यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामधील नागभीड तालुक्यात घडलेली घटना यासह गेल्या काही दिवसात प्रत्येक दिवसांमध्ये बलात्काराच्या घटना रोज घडत असलेल्या बातम्या सातत्याने प्रसार माध्यमातून तथा वृत्तमान पत्रांमध्ये बघायला मिळत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना ही नागभीड मध्ये बस स्थानकावर एका मतिमंद मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार करून चित्रीकरण करणारी घडली. भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी थरारक क्रूर बलात्काराच्या घटना घडल्या या सर्व घटनेमधील बलात्कारी नराधमांना तात्काळ फाशी देण्याची मागणी आज दिनांक-27/08/2024 ला आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे व आम आदमी पक्ष राजुरा विधानसभेतील पदाधिकारी व या घटनांनी संतापलेल्या शेकडो स्थानिक महिलांनी प्रशासनाला निवेदन देत निदर्शने व घोषणा करत केली आहे.
यासह ज्या ज्या शाळा, कॉलेज, वस्तीगृहामध्ये व आश्रम शाळेमध्ये CCTV कॅमेरे लागले
नाहीत, त्या सर्व ठिकाणी शासनाने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्काळ CCTV कॅमेरे लावून नियमित मेंटेनन्स करण्याची देखील मागणी यावेळेस श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी केली.
🚨एका रात्रीत सत्ता बदलू शकते,
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते,
एका रात्रीत लॉक डाउन होऊ शकत,
मग एका रात्रीत बलात्कारायला फाशी का नाही होऊ शकत ❓
असा सवाल यावेळेस प्रशासनाला निदर्शनाच्या माध्यमातून श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यासह निदर्शनातील सर्व सहभागी महिलांनी केला.
*राजुरा तहसील विभागासंबंधीत:-*
राजुरा तहसील कार्यालयामधील कर्मचारी/अधिकारी सौ. इनमूलवार मॅडम व इतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांचे/ नागरिकांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व इतर अत्यावश्यक कागदपत्रांची कामे जाणीवपूर्वक अनेक दिवस लावून देखील दिलेल्या वेळात करून देत नसून नागरिकांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यास कर्मचारी भाग पाळीत असल्याच्या तक्रारी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्याकडे नागरिकांनी करताच आज दिनांक-27/08/2024 ला नायब तहसीलदार राजुरा यांना अशा निष्क्रिय अधिकारांची तात्काळ बदली करून प्रामाणिक सक्रिय अधिकाऱ्यांना नियुक्त करून जनतेची अत्यावश्यक कागदपत्रांची कामे वेळेच्या आत करून देण्याची मागणी यावेळेस केली.
*गडचांदूर अमलनाला धरण विशेष*-
गडचांदूर भागामध्ये सिमेंट कंपन्या व वेकोली द्वारे करण्यात येणाऱ्या वाहतुकीमुळे होणारा प्रदूषणाचा दुष्परिणाम हा गडचांदूर येथील रहिवासी यांच्यासह आजूबाजूला असलेल्या अनेक गावांना सोसावा लागत असून अवजड वाहतुकीमुळे आजपर्यंत हजारो लोकांना याठिकाणी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. असे असताना देखील अमलनाला धरण या ठिकाणी करण्यात आलेल्या सौंदर्यकरणाचा उपभोग घेण्याकरता गडचांदूर वासीयांकडून शुल्क आकारल्या जाण्याची अत्यंत दुखद बाब येथील संतप्त नागरिकांनी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी स्थानिकांकडून फक्त त्या ठिकाणी पुरवण्यात येणाऱ्या सेवांच्या मोबदल्यामध्ये अत्यल्प शुल्क आकारावे अशी मागणी आज दिनांक-27/08/2024 ला संबंधित प्रशासन तथा नायब तहसीलदार राजुरा केली आहे.
यावेळेस राजुरा विधानसभा क्षेत्रातील आम आदमी पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी तथा सहकारी व विविध भागातून आलेल्या महिला तरुणांचा समावेश होता.