चंद्रपूर/भद्रावती:- आम आदमी पार्टी भद्रावती च्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले. वारंवार नगर परिषद प्रशासनाला निवेदन देउन आंदोलनाचा इशारा देऊन झोपलेल्या नगर परिषदेला जाग आली.
गेल्या 2 महिन्या पासून नागपूर – चंद्रपूर हायवे वरील भद्रावती ते सुमठाना हा रोड वरील स्ट्रीट लाइट अभावी होता. त्या मुळे या रोड वरील अपघाताचे प्रमाण अधिक वाढत चालले होते. पावसामुळे रोड ची परिस्थिती अजून जास्त खराब होऊन राहील होती परंतु पावसाळा लागायच्या 1 महिन्या आधीच नगर परिषदेला निवेदन देउन काम मात्र सुरू झालेलं नाही. शेवटी आम आदमी पार्टी भद्रावती च्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेऊन दुसऱ्यांदा 12 ऑगस्ट 2024 ला जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांचा मार्गदर्शनात व शहर अध्यक्ष अनिल कुमार राम यांच्या नेतृत्वात निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यावेळी मुख्याधिकारी मॅडम यांनी आश्र्वासन दिले की येत्या 7 दिवसाच्या आत स्ट्रीट लाईट चे काम सुरू करण्यात येईल. अखेर आम आदमी पार्टी च्या प्रयत्नाला यशाची प्राप्ती झाली. आम आदमी पार्टी च्या शिष्टमंडळ ने मुख्याधिकारी मॅडम व नगर परिषद भद्रावती चे आभार व्यक्त केले.