शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना काॅलेज कक्ष च्या वतीने सामाजिक उपक्रमाद्वारे स्वतंत्रता दिवस साजरा…!

0
16

पुर्व विदर्भ सचिव,सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे यांच्या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निशुल्क शैक्षणिक साहित्य बॅंक च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट व महिलांना वृक्ष रोपटे वाटप..!

स्वतंत्रता दिवस व शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या भगवा सप्ताह चे औचित्य साधून आज युवासेना काॅलेज कक्ष च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, सन्मानीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे,शिवसेना- युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार,युवासेना विभागीय सचिव, सिनेट सदस्य प्रा निलेश दादा बेलखेडे यांच्या संकल्पनेतून, विस्तारक संदिप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निशुल्क बुक बॅंक च्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य किट तसेच महिलांना वृक्ष रोपटे भेट देऊन स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम काॅलेज कक्षाचे आदर्श लाडस्कर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी स्वतंत्रता सैनिक,महापुरूषांना अभिवादन करून विद्यार्थी, महिलांना स्वतंत्रता दिनाचे महत्त्व, सांगून उपस्थितींना सामाजिक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश सुद्धा देण्यात आले.. यावेळी काॅलेज कक्षाचे रोशन टेंभरे,विकी मेश्राम,गणेश नक्षिणे ,टिकेश गेडाम ,प्रणय मोहितकर, अयान खान व हिमांशू तपासे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here