चंद्रपूर :- शहरातील सामाजिक, सांस्कृतिक व कीडा क्षेत्राशी समर्पित व्यक्तीत्व, कमल स्पोर्टंग क्लब, चंद्रपूरचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही कमल स्पोर्टंग क्लबच्या वतीने दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक गंजवार्ड येथे सरदार पटेल महाविद्यालय जवळील आयएमए सभागृहात सकाळी 09 वाजेपासून प्रारंभ होत असलेल्या या शिबीराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर राहणार असून. मान्यवर अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर होणार आहे.
या शिबीरास युवकांनी तसेच रक्तदान इच्छुकांनी बहुसंख्येनी उपस्थित राहुन ‘रक्तदान-जीवनदान’ या भावनेतून रक्तदान करावे व राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन कमल स्पोर्टीग क्लब, चंद्रपूरच्या वतीने करण्यात
आले आहे.