खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध मागन्या संदर्भात शासनाकडे चर्चा करुन प्रसंगी अनेक वेळा आमदार असतांना विधानसभेत तर आता लोकसभेत मागणी केली त्यापैकी शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन च्या मागणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने समिती स्थापन करुन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला आहे.
चंद्रपूर लोसकभा क्षेत्रातील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकभिमुख अनेक मागण्या शासन दरबारी केल्या होत्या. त्यासंदर्भात शासनाने अनेक मागण्यांची पुर्तता देखील केली होती. प्रतिभा धानोरकर आमदार असतांना विधानसभेत शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी याकरीता विधानसभेत प्रश्न उचलून धरला होता. लोकसभेत देखील पहिल्याच अर्थसंकल्पीया भाषणा दरम्यान त्यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात आवाज उठविला होता. त्यांच्या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून त्यांसंदर्भात शासनाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक आमदार समावेशित समिती स्थापन केली आहे. हि समिती जुनी पेन्शन लागू केल्यास शासनावर किती आर्थीक भार येणार या संदर्भात अभ्यास करुन शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. भविष्यातील निवडणूका लक्षात घेता ही समिती स्थापन केली का? असा देखील प्रश्न या निमित्त्याने शिक्षकांना पडला आहे. परंतु खासदार धानोरकर यांनी या निर्णयाचे स्वागत करीत समिती या संदर्भात लवकर अहवाल सादर करुन 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आशा व्यक्त केली आहे.