ग्रामिण भागातील प्रामुख्याने काम करणारी संस्था म्हणुन उमेदची ओळख आहे. या मध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असुन या कर्मचा-यांच्या मागण्या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन प्राप्त झालेहोते. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई येथे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांची भेट घेवुन निवेदनातील समस्यावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानातील कर्मचा-यांनी खा. धानोरकर यांना भेटुन आपल्या मागण्या संदर्भात निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने खा. धानोरकर यांनी विधानभवन येथे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांची भेट घेत उमेद मधील कर्मचा-याच्या मागण्या सदर्भात चर्चा करुन कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची विनंती केली. या मध्ये प्रामुख्याने या अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमीत विभाग म्हणुन आस्थापनेला मान्यता देणे व या मधिल कार्यरत कर्मचा-यांना कायम स्वरुपी सेवेत सामावुन घेणे, प्रभाग संघ स्तरावरिल व्यवस्थापकाना उमेद अभियानातील कॅडर प्रमाणे मानधनात वाढ करणे, गाव स्तरावर गाव फेरी आयोजनातुन उपजिवीका क्षमता बाधणी व बेरोजगार वर्धनिला रोजगार संधी उपलब्ध करुन देणे, समुदाय स्तरिय संस्थांना निधी व पदाधिका-याना प्रवास भत्ता व उपस्थिती भत्ता देण्यात यावा या मागण्या सदर्भाने चर्चा करण्यात आली. तसेच दि. 27 जुन 2024 रोजी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री याच्या समवेत झालेल्या बैठकीची आठवण करुन दिली. मा. मंत्री महोदय यांनी सदर विषया सदर्भात लवकरच मागन्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले.