क्रांतीलढ्याचे साक्षीदार असलेल्या चिमुरात आणीबाणी काळादिवसाचे स्मरण
चिमुर :- माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधीजींनी 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटला. आणीबाणीत अनेक राष्ट्रभक्त, विचारवंत, पत्रकार, शिक्षणतज्ञ, कलाकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महान विभुती, महिला, पुरूष व हजारो आंदोलनकारी युवकांना कारागृहाच्या कालकोठडीत डांबून देशावर हुकूमशाही लादण्याचे पाप केले. आज हा दिवस संपुर्ण देश ‘काळा दिवस’ साजरा करीत आहे असे प्रतिपादन चिमुरचे आ. किर्तीकुमार भांगडीया यांनी केले.
आ. भांगडीया यांच्या चिमुर येथील नवीन जनसंपर्क कार्यालयात दि. 25 जून रोजी लोकतंत्र सेनानींच्या सत्कार प्रसंगी आ. भांगडीया बोलत होते. ते म्हणाले की, जे आज आणीबाणीचे समर्थक व हुकूमशाही विचाराचा वारसा सांगणारे, संविधान बदलणार म्हणून गळा काढून ओरडत आहेत. तेच लोक लोकशाहीचे खरे मारेकरी आहेत याचा देशवासीयांनी अंतर्मुख होवून विचार करावा असेही ते म्हणाले. यावेळी आ. भांगडीयांनी उपस्थित सर्व आणीबाणी विरोधी संघर्ष नायकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.
या कार्यक्रमात आणीबाणी काळात मिसाबंदी व सत्याग्रह करणाऱ्या संघर्ष नायकांनी तसेच दिवंगत लोकतंत्र सेनानींच्या परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमास उपस्थितांना लोकतंत्र सेनानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सहारे, गिरीष अणे, बाबासाहेब भागडे, श्री. व सौ. सुमनताई पिंपळापुरे आदिंनी संबोधित केले. याप्रसंगी दिलीप शिनखेडे, सालोटकर, भुसारी, अनिल अंदनकर, मोरेश्वर ठिकरे, नेवासकर आदिंची उपस्थिती होती. लोकतंत्र सेनानींनी या काळ्या दिवसानिमित्त आणीबाणीचा जाहीर निषेध केला. संघटनेच्या वतिने आ. भांगडीया यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.