रेती घाट बंद असल्यामुळे मजुरांवर्ती व बांधकामाशी संबंधित कारागीर वर्गावर आली उपासमारीची वेळ  .

0
12

 

रेती घाट सुरु करा किंवा जनतेला मुबलक रेती उपलब्ध करून द्या अन्यथा प्रशासनाच्या विरोधात करू तीव्र आंदोलन आम आदमी पार्टी चे संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर यांचा प्रशासनाला व पालक मंत्री यांना इशारा 

 

आज.२७ मे ला:- योगेश मुऱ्हेकर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना रेती घाट सुरु करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनच्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले की रेती घाट बंद असल्यामुळे व रेती उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यातील रेती वर अवलंबुन असलेली सगळी कामे रखडलेली असून बांधकाम क्षेत्राशी जुळलेले सर्व व्यावसायिक व कारागीर, मंजूर वर्ग यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,

 

रेती मुळे जिल्ह्यातील ४०/टक्के लोक्काचा उदर निर्वाह चालतो, रेती मुळे जिल्ह्यात ४०/टक्के लोकांना रोजगार मिळतो, रेती बंद असल्यामुळे ज्या लोकांना घरे बांधायची होती, ज्यांना घरे, दुकानें व इतर बांधकाम, घरकुलां चीबांधकामे करायचे होते अश्या सर्वांची बांधकामे रेती अभावी बंद पडलेली आहे. प्रशासनाने रेती बंद केल्या मुळे जिल्ह्यात रेती चा तुटवडा असून ज्यांच्या कडे रेती चा साठा आहे अश्या व्यापाऱ्यांनी रेती चा भाव दुप्पट केलेला आहे जो सर्व साधारण जनतेला परवडण्या सारखा नाही, रेती बंदी मुळे बांधकाम व्यवसाय पूर्ण पणे बंद पडलेला आहे व त्यामुळे या व्यवसायाशी निगडित व या व्यवसायावर अवलंबून असणारे सर्व कामगार, मंजूरवर्ग यांच्यावर उपसमारीची वेळ आलेली आहे, एका रेती मुळे जिल्हातील प्रशांसनाचा महसूल तर बुडतच आहे सोबतच रेती बंदी मुळे मार्केट आर्थिक संकटात सापडलेलं आहे चंद्रपूरातील उद्योग धंदे मंदी च्या विळख्यात सापडलेली आहे, जिल्ह्यातील,हार्डवेअर, टाईल्स, लोहा, सिमेंट, पेंट, इलेट्रॉनिक, इलेक्ट्रिकल्स,. पीव्हीपी पाईप्स, सिरीयमिक्स, गिट्टी माती मुरूम इत्यादी यां सर्व वस्तूंचे व्यापार करणारे व्यापारी यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे, त्यामुळे यांच्या कडे काम करणारे कारागीर, कामगार, मंजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

यांच्या सोबतच जिल्ह्यात बाराही महिने कन्स्ट्रक्शन व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातून, व राज्यातून उदा. गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्हा तसेच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा यां राज्यातून मजूरवर्ग हा मोठया प्रमाणात चंद्रपूर ला येतात व रोजगार मिळवितात पण आता मागच्या चार पाच महिन्या पासून रेती मिळत नंसल्यामुळे यां लोकांनवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्या हाताला काम नाही उदर निर्वाह करायला पैसा नाही पावसाळा तोंडावर आल्यामुळे शेती पेरायला पैसा नाही कारण रेती शी निकडीत असलेल्या व्यवसायावर मजुरी व रोजनदारी करून शेती साठी पैसा जुळवणे व तोच पैसा शेतीला लावणे असा उपक्रम वर्षा नु वर्षे सुरु असतांना मध्येच चार पाच महिन्या पासून रेती बंदी मुळे बेरोजगारी आली व आता हा वर्ग भारी संकटात सापडलेला आहे यांच्या सोबतच जिल्ह्यातील बांधकाम मिस्त्री, कारागीर, स्टील कारागीर, लोहा कारागीर, कार्पेन्टर, टाईल्स कारागीर पी ओ पी कारागीर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रिकल्स, पुन्हा अश्या प्रकारच्या कितीतरी कारागीर व मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आता यां लोकांची सहन शक्ती संपलेली असून प्रशासनाला यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल.

 

शासनाच्या यां रेती बंद च्या धोरणामुळे जिल्ह्यात सर्वत्र बेरोजगारीचे संकट पसरलेले आहे व यांचा फायदा अवैध रेती चोर व अवैध रेती व्यावसायिक घेत आहे प्रशासनाने रेती बंद करून ठेवल्या नंतर व रेती घाट बंद असून सुद्धा संपूर्ण जिल्ह्यात रात्रीच्या वेळेला बांधकाम साईट वर रेती चोर मुबलक रेती टाकतांनाचे चित्र सर्वत्र दिसत आहे सर्व साधारण जनतेची जिथे बांधकामे बंद आहे तिथे मात्र धनदांडग्याची कामे व त्या बांधकाम साईट वर रेती मात्र मुबलक दिसत आहे मग असा दुजाभाव कां बर होत आहे गोर गरिबांचे कामे बंद मात्र श्रीमंताचे सुरु यामुळे जनते मध्ये सभ्रम निर्माण होऊन प्रशासना बद्दल राग निर्माण होत आहे.

 

करिता प्रशासनाने व पालक मंत्री यांनी जनतेची समस्या लक्ष्यात घेता लवकरात लवकर रेती घाट सुरु करून जिल्ह्यात मुबलक रेती उपलब्ध करून ध्यावी, जेणेकरून पावसाळा तोंडावर आला असून लोकांची अर्धवट राहिलेली बांधकामे पावसाळ्या आधी पूर्ण होईल जी कामे लोकांना उन्हाळ्यात करायची होती पण प्रशासनाच्या नाकर्तेपणा मुळे आता तिच कामे पावसाळ्यात करावी लागेल

 

. जनतेच्या समस्या कडे सकारात्मक दृष्टीने पाहून एका साप्ताहत योग्य तो निर्णय घ्यावा अशी आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने निवेदन देण्यात आले,

अन्यथा आम्हाला संपूर्ण जिल्ह्यात रेती सुरु होण्या करिता जण आंदोलन उभारावे लागेल तसेच रेती बंद कां आहे आणि यां मागील काय अडचण आहे व केव्हा सुरु होणार करिता स्थानीय आमदार व जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल तसेच जिल्ह्याधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा पार्टीचे संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर यांच्या वतीने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here