सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही
शाळा ही गावाचं आकर्षण आणि भूषण असावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. त्यासाठी पालक धडपडत असता, .काही यशवंत होतात तर काही प्रयत्नशील असतात अशीच चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील येरगाव जिल्हा परिषदेची शाळा, ही शाळा पालक व गावकरी यांच्या सहकार्याने नावारूपाला आली होती. मात्र प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री.किशोर पिसे यांचा प:क्षपात व भेदभावाच्या प्रशासकिय वर्तनामुळे आज येरगांव शाळेतील विद्यार्थी शिक्षकाविना व पूरक आहार पासून वंचित आहेत. प्रत्येक शाळेरीता एक व्यवस्थापन समिती कार्यरत आहे, बालकांचया मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ प्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती नेमलेल्या आहेत,समितीमार्फत शाळेतील कांमाचे संनियंत्रण होंत असते,शाळेतील शिक्षकांच्या समस्या व गैरवर्तणुकिच्या गोष्टीही वरिष्ठाकडें कळवाव्या लागत असल्याने येरगांव शाळेच्या व्यवस्थापन समितीने शाळेतील शिक्षकांच्या तक्रारी केल्या होत्या. त्या आधारावर प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी न करता तेथील दोन्ही शिक्षकांची बदली केलेली होती. त्याअर्थी नवीन शिक्षकांची पोस्टींग करणे क्रमप्राप्त होते. पण तसे झाले नाही.उलटपक्षी बदली केलेल्या शिक्षीकेची पुन्हा येरगांव शाळेत पुन: पोस्टींग करण्यात आली.वास्तविकत: दोन्ही शिक्षकांची बदली केल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून इतर शिक्षकांची पोस्टींग वा प्रभार देणे क्रमप्राप्त होते. पण प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर पिसे यांनी दोन्ही शिक्षकांप्रती एकसमान न्याय न ठेवता भेदभाव व प:क्षपाती करुन कु.संगीता कुंभारे हिला पूर्ववत येरगांव शाळेत पोस्टींग केल्यामुळे गांवातील अशांतता पसरलेली होती. व श्री.सागर शंभरकर (राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त) शिक्षक यांचेवर अन्याय झाल्याची भावना निर्माण होणे साहजिकच असून मनात तिव्र चिड निर्माण होवून असंतोषाची भावना व्यक्त केली होती. असे होणे साहजिक व स्वाभाविक होते. कारण प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर पिसे यांनी सेवेत दाखल झालेनंतर सर्वश्रेष्ठ भारतीय राज्यघटनेविषयी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे व कोणाही प्रती कोणताही भेदभाव व प:क्षपाती केला जाणार नाही अशी शपथपत्र केले आहे.त्यांना त्याचा विसर पडलेला दिसतो.त्यामुळे दोन्ही शिक्षकांची बदली केल्यानंतर पुन्हा एका शिक्षीकेला पुर्ववत पोस्टींग देणे म्हणजे कर्मचाऱ्याप्रती भेदभाव निर्माण केल्यासारखे असून सर्वथा ज्याच्यावर न्यायाचे तराजू समान ठेवण्याची जबाबदारी आहे अशा समान उदिष्टयांचा भंग प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री.किशोर पिसेकडून झालेला आहे,सर्वश्रेष्ठ राज्यघटनेचे आर्टीकल १४ चे उल्लंघन झाले आहे.शिवाय महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियमांचाही भंग झाला आहे. आणि म्हणून या गंभीर बाबीसंबंधाने स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटनाचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष देवांश ऊराडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे चे गैरवर्तनाबद्यलची तक्रार शिक्षण विभागाचे प्रधान सचिव,आयुक्त, शिक्षण संचालक प्राथमिक यांचेकडे तक्रार करुन भारतीय संविधानाप्रती एकनिष्ठता न बाळगणे ही गैरवर्तणीची बाब असून अशा गैरवर्तनाला कोणत्याहीकायद्यात संरक्षण देणेची तरतुद नसल्याने जसे कु.संगीता कुंभारे , श्री.सागर शंभरकर शिक्षक यांना किरकोळ स्वरुपाच्या गैरवर्तनाखाली कोणत्याही प्रकारची नोटीस न बजाविता, बाजू मांडण्याची संधी न देता व वैयक्तिक म्हणणे न एैकता निलंबन कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने केलेली आहे.त्याच धर्तीवर कर्मचाऱ्याप्रती भेदभाव व प:क्षपात करुन बदली करणे/शिक्षिका संगीता मधुकर कुंभारे यांचे पुनर्रस्थापना पदस्थापनेचे आदेश काढणे,प्रभार संबंधाने वारंवार पत्रव्यवहार करून दखल न घेणे.
शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणे.
संविधानाप्रती एकनिष्ठ राहून कार्य न करणे, शपथपत्राचे उल्लंघन करणे, तक्रारीमध्ये वेळेत चौकशी न करता दडवून ठेवणे, एखाद्या शिक्षकाला अनुलक्षून कार्य करणे, हया बाबी गंभीर असल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांचेवर निलंबन कारवाई करणेची मागणी केली आहे.
देवांश उराडे राजाध्यक्ष
स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटना