गावकर्यांनी मानले आभार, पक्का रस्ता बनविण्यासाठी निधी देणार.
चंद्रपूर:- खुटळा येथील लवजी नगर कडे जाण-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने सदर ले – आउट धारकाने गावाकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना अडचण निर्माण झाली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे सदर रस्ता गावक-यांसाठी मोकळा करुन दिला आहे. तसेच येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे म्हटले आहे.
खुटाळा येथे लहुजी नगर आहे. मागील 40 वर्षापासून सदर गाव येथे असून या गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सदर मार्ग आपल्या ले – आउट मध्ये असल्याचे सांगत ले – आउट धारकाने गावक-यांचा रस्ता बंद केला होता. अशात गावक-यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान गावातील एका मुलीची प्रकृती खराब झाली. तीला रुग्णालयात नेण्यासाठी सदर मार्गाचा वापर करु दिल्या गेला नाही असा आरोप गावक-यांनी केला आहे. ही बाब कळताच आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावाला भेट देत गावक-यांची समस्या समजून घेतली. यावेळी संबधीत ले – आउट धारकाला बोलावून त्याची समज काडण्यात आली असून सदर मार्ग पुन्हा गावक-यांसाठी मोकळा करण्यात आला आहे.
तसेच सदर मार्गाचे पक्के बांधकाम करण्यासाठी आवश्यक तिथका निधी आपण उपलब्ध करुन देउ अशी ग्याही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावक-यांना दिली आहे. गावकडे जाण्याचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. यापुढे असा प्रकार घडता कामा नये. असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी गावक-यांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आणि गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.