श्री साई पाॅलिटेक्नीक मध्ये पालक सभा संपन्न इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे आयोजन

0
21

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील तंत्रज्ञान शिक्षणासाठी नामांकित शिक्षण संस्था येरगूडे गृप संचालित श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर च्या इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने संस्थेचे सचिव अमितजी येरगूडे ,उपाध्यक्ष अभिषेकजी येरगूडे व प्राचार्य पिल्लारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी पालक सभा (Parents meet) चे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.सुरवातीला विभाग प्रमुख प्रा पाकमोडे यांनी प्रस्तावना करतांना उपस्थित पालकांचे स्वागत करीत सर्व प्राध्यापकवर्ग व ते शिकवित असलेल्या विषयांची माहिती ओळख करून दिली तसेच एमएसबीटीई च्या वतीने दिलेल्या द्वितीय व तृतीय सेमिस्टर अभ्यासक्रमाची माहिती दिली सोबतचं इलेक्ट्रॉनिक विभागाच्या प्रात्यक्षिक लॅब याबाबत माहिती उपस्थितींना दिली . यानंतर यावेळी साई पाॅलिटेक्नीक महाविद्यालयाचे PRO व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा निलेश बेलखेडे यांनी आजच्या काळात उपस्थितींना विद्यार्थी व पालकांमध्ये कशा पद्धतीचे समन्वयक असणे गरजेचे आहे, चांगल्या गुणांनी उतिर्ण होण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यासप्रणाली राबविण्यात यावे, शिक्षक व पालक यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीची कर्तव्य,भुमिका तसेच संस्थेच्या वतीने तसेच विशेषतः इलेक्ट्रॉनिक विभागाच्या वतीने तंत्रज्ञान अभ्यासक्रम शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काणते कार्यक्रम राबविले जातात याबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर दुसऱ्या सत्रात उपस्थित पालकांना त्यांच्या त्यांच्या पाल्यांचा प्रगती प्रत्रकाद्वारे माहिती देण्यात आली व पालक-शिक्षक चर्चा सत्र राबविण्यात आले.यावेळी पालकांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त करीत सुचना सुद्धा केल्या व सध्यस्थितीत विभागाच्या कार्यप्रनालीबद्दल समाधान व्यक्त करित प्रशंसा केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंकज धोटे सर यांनी केले तसेच यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विभाग प्रमुख पाकमोडे सर, प्रा निलेश बेलखेडे, प्रा धोटे सर प्रा पाटील मॅडम, बोबडे मॅडम, प्रा भालोटिया सर, प्रा पाठक सर, सचिन ढेंगळे सर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here